खामगावातील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची बदली

 

खामगाव : प्रतिनिधी । खामगाव येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाय यांची विनंती बदली नुकतीच बुलढाना येथे झाली आहे.

 

जायभाय सन 2017 मध्ये  खामगाव येथे कार्यकारी अभियंता पदावर  रुजू झाले होते .जिल्ह्यातील सर्वात मोठा विभाग म्हणून खामगाव महावितरण विभागाची ओळख आहे कुशल पद्धतीने त्यांनी कामकाज हाताळले .

 

आज त्यांना खामगाव विभागीय कार्यालयातील अभियंता व कर्मचारी यांच्या वतीन छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. याप्रसंगी कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये यांनी सर्व विभागीय अभियंता, कर्मचाऱ्यांनी कामात दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले . प्रभारी कार्यकारी अभियंता प्रशांत चौधरी, उपकार्यकारी अभियंता दिलीप वक्ते , अभियंता चेतन पाटील , अभियंता राठोड , मा.स.  चे उपव्यवस्थापक मनीष कदम यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होता . कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये यांची बुलढाणा येथे बदली झाल्याने प्रशांत चौधरी यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.

 

Protected Content