येत्या १५ दिवसात निधी वाटप करण्याबाबत निवेदन

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयामार्फत ग्रामीण भागात काही ठिकाणी 5% निधी वाटपामध्ये विलंब आणि टाळाटाळ होत असून येत्या १० ते १५ दिवसात निधी वाटप करण्यात यावा. दरम्यान, याबाबत लेखी पत्राव्दारे कळविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आज पंचायत समिती कार्यालय, सभापती, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी यांना राष्ट्रीय विकलांग पार्टीच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे  पंचायत समिती कार्यालय  बोदवड अंतर्गत तालुक्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय च्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी ५% टक्के निधी वाटप करण्याबाबत दिरंगाई व टाळाटाळ केलेली दिसून येत असल्यामुळे राष्ट्रीय विकलांग पार्टी च्या माध्यमातून  पंचायत समिती कार्यालय बोदवड अंतर्गत बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय येथून दिव्यांग बांधवांना येत्या १०ते१५ दिवसात दिव्यांग बांधव यांना ,५% टक्के निधी वाटप करण्यात यावा, व निधी वाटप केल्याबाबत लेखी पत्राद्वारे कळविण्यात यावे, आपण न कळविल्यास राष्ट्रीय विकलांग पार्टीच्या माध्यमातून प्रशासनाला जाग यावी याबाबत भजनी / ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल, त्यांच्या निर्दशनास आणून देण्यासाठी आज रोजी निवेदन देण्यात आले.

तसेच बोदवड येथील तहसीलदार तथा दंडाधिकारी सो,तहसील कार्यालय बोदवड प्रथमेश घोलप जी साहेब यांना दिव्यांग बांधवांना अंत्योदय यादी मध्ये समाविष्ट करण्यात यावे याबाबत 30 ते 40 लोकांचे सविस्तर कागद पत्र त्यांना देण्यात आले असून पुढील  लाभ दिव्यांग बांधवांना देण्यात येईल याबाबत तहसीलदार साहेब यांनी आश्वासन दिले. उर्वरित असलेल्या लाभार्थ्यांनी सविस्तर कागदपत्रे जिल्हा पदाधिकारी अनिल भोई सर बोदवड , तालुका जनसंपर्क भगवान सुर्यवंशी बोदवड याच्या कडे जमा करावे असे सुचना  प्रदेश अध्यक्ष  धनराजभाऊ गायकवाड यांनी दिव्यांग बांधव यांना केल्या.

निवेदन देतेवेळी उपस्थित असलेले राष्ट्रीय विकलांग पार्टीचे पदाधिकारी धनराज गायकवाड, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष, बोदवड तालुका अध्यक्ष सचिन उगले, जिल्हा सचिव किशोर बडगुजर, जिल्हास्तरावरील पदाधिकारी अनिल रेंगे, तालुकाध्यक्ष तृतीयपंथी विशाल घुले, शहराध्यक्ष श्याम लुड, बोदवड जनसंपर्क प्रमुख भगवान सूर्यवंशी, नरेश डहाके, विष्णू सुतार, राहुल तायडे निलेश मुहेकर व  दिव्यांग बांधव उपस्थित होते.

 

 

Protected Content