वडगाव टेक ग्रामपंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता

पाचोरा प्रतिनिधी । ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजले जाणारे वडगाव टेक ग्रामपंचायतीत ७ पैकी ७ जागा जिंकुन प्रतिस्पर्धी पॅनलचा धुव्वा उडविला आहे.

बांबरुड – कुरंगी गटाचे जि.प. सदस्य पदमसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुषण प्रभाकर पाटील, दामिनी विजय पाटील, ललिता भगवान पाटील, सोनल योगेश कुमावत, रमेश शांताराम पाटील, मंगलाबाई सुरसिंग भिल, भिमा सोमा भिल हे ७ सदस्य निवडून आले आहेत. निवडुन आलेल्या सदस्यांचे व जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे निवासस्थानी अभिनंदन केले आहे.

Protected Content