डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘पोषण व आरोग्य मार्गदर्शन’ विषयावर कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि शारीरिक शिक्षण विभाग आणि विस्तार उपक्रम समिती, डॉ.अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पोषण आणि आरोग्य मार्गदर्शन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

 

 

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. गौरी राणे होत्या. प्रारंभी कार्यशाळेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते  दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर कार्यशाळा समन्वयक डॉ. अनिता कोल्हे यांनी प्रास्ताविकातून एक दिवसीय कार्यशाळा आयोजन करण्यामागील भूमिका व  कार्यशाळेची रूपरेषा मांडली. सदर कार्यशाळा कबचौ उमवि जळगाव विद्यापीठाच्या आर्थिक सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर  डॉ. दिनेश पाटील, संचालक, क्रीडा विभाग, कबचौ  उमवि जळगाव यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले, क्रीडा क्षेत्र हे उत्तम क्षेत्र असून यशस्वी खेळाडू होण्यासाठी निष्ठा, प्रचंड मेहनत, जिद्द, जबाबदारी सोबतच उत्तम पोषण आहार, आरोग्य व व्यायाम याविषयी विद्यार्थिनींना अनमोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर पहिल्या सत्रात माजी क्रिकेट पटू व आरोग्य सल्लागार श्री.सुयश बुरुकुल यांनी योगा, प्राणायाम, व्यायाम, पोषण आहार, आराम तसेच नियोजनबद्ध दिनचर्या या विषयावर प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. तसेच सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या समस्यांचे निराकरण केले. त्यानंतर द्वितीय सत्रात आरोग्य तज्ञ सौ.भाविका शहा यांनी ताण,तणाव,भीती,पचन संस्था झोप, मानसिक आरोग्य या विविध विकारांचे कारण व उपाय याविषयी  अतिशय हसत खेळत शैलीत  विद्यार्थिनींना आरोग्याचे महत्व पीपीटी सादरीकरनाद्वारे प्रभावीपणे पटवून दिले.

 

यापुढे भोजनानंतरच्या दुपारच्या तिसऱ्या सत्रात योग, पोषण व आहार आणि निसर्गोपचार तज्ज्ञ  डॉ.सोनल महाजन यांनी पोषण, आहार व आरोग्य या विषयावर बोलताना आपला आहार कसा असावा? याविषयी सखोल मार्गदर्शन करताना आहाराचे प्रकार, विविध जीवनसत्व,विविध आजार त्याचे कारणे व उपाययोजना याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण चर्चा या व्याख्यानातून केली. तसेच आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बाबी विद्यार्थिनींना त्यांनी सांगितल्या व सत्राचा  शेवट प्रश्नोत्तरराने झाला. यानंतर कार्यशाळेच्या अध्यक्षीय मनोगतातून  प्राचार्य डॉ. गौरी राणे  यांनी व्यायाम, हिमोग्लोबिन,आहार या त्रिसूत्री बद्दल विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच कार्यशाळा आयोजना मागील महत्त्व विद्यार्थिनींना पटवून दिले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रो.डॉ. व्ही. जे. पाटील उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. अनिता कोल्हे  व विस्तार उपक्रम समिती प्रमुख डॉ. दिपक किनगे यांनी काम पाहिले.  तसेच यशस्वी आयोजनासाठी डॉ. सुहास चौधरी, डॉ.आर.जी.बावणे, प्रा. दीपक पवार, डॉ. विनोद नन्नवरे, प्रा. सायली पाटील, प्रा. निलेश कोळी , प्रा. छाया चिरमाडे तसेच शिक्षकेत्तर सहकारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रुपाली चौधरी यांनी केले तर आभार डॉ. दिपक किनगे यांनी मानले. या कार्यशाळेत 100 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. त्यांना  सहभाग प्रमाणपत्र देवून कार्यशाळा संपन्न झाली.

Protected Content