उद्यापासून दहावीची परिक्षा; कॉपीमुक्त परीक्षेसाठी कासोदा केंद्र सज्ज

कासोदा प्रतिनिधी । कासोदा केंद्रात साधना माध्यमिक विद्यालय, हाजी एनएम सय्यद उर्दु हायस्कूल, शहजादी उर्दु हायस्कूलात उद्या ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या एसएससीबोर्ड परीक्षेत मराठी व उर्दु मध्यमचे एकूण ६८२ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहे.

परीक्षा बैठक याप्रमाणे
परीक्षा क्रमांक डी. १९४४५७ ते डी. १९४६६३ पर्यंतच्या एकुण ६८२ विद्यार्थ्यांना एकूण २९ ब्लॉकची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात मराठी माध्यमच्या ३ शाळा तर २ शाळा उर्दु माध्यम व एक शासकीय आश्रमशाळा आहेत. दोन दिव्यांग विद्यार्थी असून त्याची बैठक व्यवस्था वेगळी करण्यात आली आहे. तर पुर्नपरिक्षेस मराठी माध्यमचे १६ व उर्दु माध्यमचे ३ विध्यार्थी फेर परीक्षा देत आहेत.

कासोदा केंद्रात गावातील साधना माध्यमिक विद्यालय, मंत्री माध्यमिक विद्यालय, भारती विद्या मंदिर, लिटिल व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल, सार्वजनिक माध्यमिक विद्यालयासह परिसरातील निपाने, आडगाव, सोनबर्डी, तळई, जवखेडे, शाळेतील विद्यार्थी आपले दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणार आहेत. पण यात गुणवंत विद्यार्थी घडले पाहिजे म्हणून एसएससीची परीक्षा कॉफी मुक्त व्हावी, यासाठी शिक्षण विभाग केंद्रसंचालक, शाळेतील मुख्याध्यापक, पोलीस प्रशासन यांनी आजच उपाययोजना कराव्यात.

परीक्षा केंद्राबाहेर टवाळखोर मुलांवर आळा घालण्यासाठी कासोदा पोलीस स्टेशनला २०२० ची दहावीची परीक्षा शर्तीची ठरणार आहे. यासाठी १०० मीटर अंतराच्या आत कोणीही थांबवू नये, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, सुज्ञ नागरिक, विद्यार्थी, शाळेतील शिक्षक करीत आहे. याकडे शिक्षण विभागाने व पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी होतांना दिसत आहे. तर केंद्र संचालक गोपाल सावंत यांनी गावातील प्रत्येक छोटे-मोठे घरगुती दुकानदार यांना लेखी निवेदन सादर करून पेपर असल्याच्या दिवशी व त्यावेळे पुरते झेरॉक्स दुकान बंद करण्यात यावे असलयाचे सांगितले असून याकडे लक्ष द्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ही ते म्हटले. परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लाईव्ह ट्रेंडस् न्यूज, कासोदा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, साप्ताहिक विचार वैभव यांच्याकडून परीक्षेच्या हार्दीक शुभेच्छा !

Protected Content