मनात जिद्द असेल तर कोणतीच परीक्षा कठिण नाही : आयएएस सृष्टी देशमुख

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बर्‍हाणपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ तथा आयएएस अधिकारी सृष्टी देशमुख यांच्या उपस्थितीत विविध मराठा समाज संघटनांच्या वतीने गुणवतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय मराठा सेवा संघ तर्फे मराठा समाजाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचा गुण-गौरव सोहळा बर्‍हाणपुर शहरात आयोजित केला होता. यावेळी आयएएस अधिकारी सृष्टी देशमुख म्हणाल्या की यूपीएससी तयारी करत असतांना मी सोशल मिडियाचा वापर करत नव्हते परंतु आयएएस झाल्या नंतर मी सोशल मीडिया वर सक्रीय झाले.तुम्ही देखिल तुमचे ध्येय साध्य होत नाही तो पर्यंत सोशल मिडीया पासुन लांब राहण्याचा सल्ला उपस्थित युवक व युवतींना दिला.

सृष्टी देशमुख पुढे म्हणाल्या की, मनात जिद्द असेल तर कोणतीच परीक्षा कठिण नाही यूपीएससी परीक्षेत स्पर्धा खुप वाढली आहे. मुला-मुलींना आवड असेल त्याच क्षेत्रात त्यांना पुढे जाऊ द्या. सद्यास्थितीत आई-वडील मुलांकडून खुप अपेक्षा ठेवताय मनासारखे करण्यासाठी त्यांच्यावर खुप प्रेशर टाकत असल्याचे प्रकार वाढत आहे.त्यामुळे मुले डिप्रेशन मध्ये जातांना दिसत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

यांची होती उपस्थिती

या कार्यक्रमाला आयएएस अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, आयएएस सृष्टी देशमुख, मराठा सेवा संघाचे कामाजी पवार, शिवाजीराजे जाधव, हभप अशोक महाराज मोरे(देहु) खंडवा खासदार ज्ञानेश्वर पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जळगाव जामोदचे आमदार आमदार संजय कुटे, उद्योजक श्रीराम पाटील, डी. डी. बच्छाव, विलास पाटील, मराठा सेवा संघाचे दिनेश कदम, इंद्रसेन देशमुख,सौ गौरी थोरात,इंदौर स्वाती काशिद,आदी प्रमुख मान्यवर होते. कार्यक्रमाची प्रास्तावना सुनिल महाजन यांनी केले तर सूत्रसंचलन सीमाताई बोके यांनी केले.

Protected Content