आयएमआर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  केसीई सोसायटीच्या आएमआर महाविद्यालयात “व्यवसायातील नवकल्पना, स्वयंचलन आणि भविष्याचा मागोवा ” या विषयावर  अंतरराष्टीय परिषद यशस्वीरीत्या संपन्न झाली. या परीषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र कुलगुरु प्रा.डॉ.एस. टी. इंगळे, यांनी केले.

 

या परिषदेसाठी  उमाकांत नारखेडे, इंन्फोसिसचे (यु एस) ह्यांचे बीज भाषण झाले. प्रमुख पाहुणे म्हणुन प्रसिद्ध उद्योजक वैभव नेहेते आणि विद्यापीठज्ञचे व्यवस्थापक  सागर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ श्वेता चोरडिया यांनी केले.

 

सुरवातीला परिषदेचे निमंत्रक डॉ. पराग नारखेडे यांनी या परिषदेची संकल्पना उपस्थित संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांसमोर विषद केली. त्यानंतर संचालक  प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी “हि काॅन्फरन्स हायब्रिड मोड असल्याने भारत भरातुन आणि परदेशातूनही अनेक संशोधक या परीषदेमध्ये सामिल आहेत. हे स्पष्ट करीत या काॅन्फरन्सची थीम आणि की ट्रेन्डस असेच आहेत की जे पुढच्या काळात डेव्हलप होणे अपेक्षित आहे.” हे सांगत संवाद साधला. उद्घाटनपर भाषणात प्रा डॉ एस टी ईंगळे प्र कुलगुरु (उ म वि) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ” व्यवसायातील इनोव्हेशन, अँटोमेशन,आणि त्याच्याशी संबंधित भविष्यातील महत्त्वाचे घटकांवरील संशोधनावर या परिषदेतून विचारविनिमय होणार आहे. भारतात संशोधन आणि त्यायोगे होणाऱ्या विकासाला खुप स्कोप आहे. अँटोमेशनवर देखिल भारत फोकस करीत आहेत. स्टीम लाईम मध्ये भविष्यातील शक्यतांचा विचार करत असताना डिजीटालाईजेशन आणि क्लाऊड बिझनेस यात भारतीय फार महत्त्वाची भुमिका घेत आहे. इथे अनुभवी लोक हवे आहेत.  त्यामुळे विद्यार्थांनी अश्या विषयांवरील संशोधनाला प्रधान्य दिले पाहिजे.

 

त्यानंतर बोलताना के सी ई चे व्यवस्थापन सदस्य डॉ हर्षवर्धन जावळे म्हणालेत, “एक डॉ म्हणुन माझ्या क्षेत्रातही अनेक ईनोव्हेशन होत आहेत. आमचे मशीन्स तर काही वेळा तीनचार कीलोचे असतात. पुर्वी चे बोजड मशीन्स जाऊन त्यांची जागा या मशीन्स नी घेतली आहे. कित्येकदा ते पेशन्टच्या घरीही बसवले जाऊ शकतात. कित्येक मोठ्या सर्जरी नंतरही आता सेम डे पेशन्ट घरी जाऊ शकतो. हे सुध्दा आमच्या क्षेत्रातील एका अर्थी मोठे ईनोव्हेशनच आहे.”

 

त्यानंतर की नोट स्पिकर  उमाकांत नारखेडे, प्रमुख मिड साईड इन्शुरन्स, ईंफोसिस, यु एस ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधले तज्ञ मार्गदर्शन करताना म्हणाले की,” आर्टिफिशियल इंटिलिजन्स हा भविष्यातील फार महत्वाचा रिसोर्स आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वात मोठा धोका हा आहे की लोक खूप लवकर निष्कर्ष काढतात की त्यांना ते समजते. आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डीप लर्निंग, मशीन लर्निग, जे तुम्ही करत आहात ते तुम्हाला पुर्णतः समजत नसेल तर ते नीट शिका अन्यथा तुम्ही नुसतेच डायनासोर व्हाल. हे इनोव्हेशन – गेल्या 50 वर्षातील औद्योगिक क्रांतीची संबंधित आहे. बिझनेस मॉडेल इनोव्हेशन करतांना तंत्रज्ञानाची सर्जनशील मूल्ये लक्षात घ्यायला हवीत. इलेक्ट्रिसीटीतील इनोव्हेशन, कॉम्प्युटरमधील इनोव्हेशन पासून बिग डेटा इनोव्हेशन पर्यंत त्यांनी अनेक गोष्टींचा आढावा घेतला.  इनोव्हेशन होत असतांना एआय ऑटोमेशनने एक विचार प्रक्रिया तयार केली.. आपण आज बघतो, इलेक्ट्रिक कारमधील संशोधन. व्यवसाय तयार करणारे मूल्य गरजेप्रमाणे मागणीप्रमाणे बदलणार. याची व्याप्ती किती व्यापक आहे. पुनर्शोधक दृष्टीकोन देखील महत्त्वपूर्ण आहे. उदाहरण बघायचे झाले तर tiktok,  डिस्नेची उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

 

 

बदल स्वीकारणे अपरिहार्य आहे. डिजिटल युगानंतर चित्रपटात देखील अनेक बदल झाले आहेत. फेसबुक हे या बदलांचे चांगले उदाहरण आहे. आर्टिफिशियल इंटीलीजन्स क्षेत्रात भारतचा  क्रियाकलाप खूप उच्च आहे. या क्षेत्रात पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त आहे. कृषी उद्योगातही चांगले मूल्य निर्माण होते.. जेनेटीकली सुधारित पीक, बियाणे आणि तंत्रज्ञान, शेतीतील प्रक्रिया यातही टेक्नॉलॉजी बदलत आहे. आपण अन्नाचा अपव्यय कसा कमी करू शकतो. हा दृष्टिकोन सुद्धा संशोधनासाठी महत्त्वाचा आहे. इतर काही ठिकाणी उदा. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा स्मार्ट फोन मध्ये वापर होतो, तुमच्या फोनमध्ये 3d प्रतिमा येत आहेत. आणि ते माहितीवर प्रक्रिया करण्यास सक्षम आहेत.

 

त्यानंतर प्रमुख पाहुणे वैभव नेहेते (उद्योजक किरण पाईप) यांचे भाषण झाले. त्यांनी सांगितले की व्यवसायात प्राथमिक संशोधन महत्वाचे आहे. आज तुम्ही काही वेगळे केले तर पुढच्या पिढीकडे ते चांगल्या स्वरुपात देऊ शकता.. आज आपल्या जळगावात रोडची कंडीशन अत्यंत वाईट आहे, सगळेच कंम्पेन्ट करतात पण त्यावर तुम्ही मार्ग काढा, संशोधन करा तर ते ईनोव्हेशन ठरेल.  कार्यक्रमाच्या शेवटी  आभार  प्रियांका खरारे यांनी मानले. यानंतर दुपारच्या सत्रात एकुण 40 मॅनेजमेंट आणि काॅम्पुटर दोन्ही विभागातील संशोधकांनी आपले संशोधन पेपर मांडले.

Protected Content