नैसर्गिक संसाधनांचा योग्य रीतीने वापराबाबत जाणीव जागृती होणे गरजेचे !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  वातावरण बदलाचा धोका व पर्यावरण संबंधी समस्यांचे निराकरणासाठी नवनवीन पर्याय व पद्धतीचे संशोधन महत्त्वाचे असल्याचे सांगत” नैसर्गिक संसाधनांचा योग्य रीतीने वापराबाबत जाणीव जागृती होणे गरजेचे” असे प्रतिपादन क. ब. चौ. उ. म. विद्यापीठाचे प्र.-कुलगुरू प्रा. डॉ. एस.टी. इंगळे यांनी केले.

 

डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, प्राणिशास्त्र व IQAC या विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “रिसर्च इन बायो, जीयो, केमिकल सायन्सेस: ए ग्लोबल सिनारिओ” या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

अध्यक्षस्थानी लेवा एज्युकेशनल युनियनचे संचालक श्री. किरण बेंडाळे हे उपस्थित होते. तुळशीच्या झाडावर मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. डॉ. रत्नमाला बेंद्रे, डॉ.अपर्णा कलावते, प्रा. डॉ. रिटा निर्मलकुमार, माजी प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

 

 

उद्घाटक प्रा. डॉ. इंगळे यांनी वातावरण बदलाचा धोका व पर्यावरण संबंधित समस्यांचे निराकरणासाठी नवनवीन पर्याय व पद्धती अंतर्गत जैवशास्त्र, रसायनशास्त्र,भूगोलशास्त्राचे संशोधन महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री. किरण बेंडाळे यांनी 1916 यावर्षी स्थापन झालेल्या लेवा एज्युकेशनल युनियन संस्थेच्या स्थापनेमागे या संस्थेच्या संस्थापकांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सुविधा करून देणे असा उदात्त हेतू असल्याचे सांगत, संस्थेतून यशस्वीपणे शिक्षण घेतलेल्या काही नामांकित माजी विद्यार्थ्यांचे उदाहरण देत त्यांनी त्यांचे कौतुक करीत या राष्ट्रीय परिषदेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या राष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक मांडताना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी या परिषद आयोजनामागील भूमिका विशद करीत महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

 

या राष्ट्रीय परिषदेत क.ब. चौ. उ. म. विद्यापीठाच्या ‘पेस्टिसाइड व ऍग्रो केमिकल्स’ विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. रत्नमाला बेंद्रे यांनी”Insect Growth Regulators as substitute to pesticides ” या विषयावर बीज भाषण करताना रासायनिक कीटकनाशकांचा वापर व त्याचे मानवी शरीरावर तसेच पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामाणबाबत सविस्तर विवेचन केले शेतीमधील किटके उंदीर मच्छर इत्यादींचा नायनाट करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक कीटकनाशके जसे कडूलिंब, सिताफळ ,हळद ,मिरची पावडर, शेवंतीचे फुले यांचा वापर वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. निर्धारित मात्रा न पाळता शेतकरी कीटकनाशकांचा अतिवापर करीत असल्याने कॅन्सर सारख्या आजारात वाढ, डीएनए गुणसूत्रांचे नुकसान, बाळाच्या नैसर्गिक वाढीत अडथळे, यासह मातेच्या दुधात सुद्धा या कीटकनाशकांचे प्रमाण दिसून आल्याचे सांगितले. ” Insect Growth Regulators” ही तिसऱ्या पिढीतील कीटकनाशके एक उत्तम पर्याय ठरू शकतात, ज्याच्या वापराने केवळ कीटकांचा नायनाट होईल व मानवी शरीरावर त्याचे विघातक परिणाम दिसणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पुणे येथील Zoological survey of India येथील शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा कलावते यांचे ” Role of DNA barcoding in solving the cryptic species complex”, तर वल्लभ विद्यानगर गुजरात येथील एन व्ही पटेल कॉलेज येथील बायोलॉजिकल सायन्सच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. रिटा निर्मल कुमार यांचे” Recent advances in science- nanotechnology “, तसेच प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी यांचे “वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र व भूगोल शास्त्राशी संबंधित स्थळ नामांचा अभ्यास” या विषयावर आमंत्रित व्याख्याने याप्रसंगी संपन्न झाली. पाहुण्यांचा परिचय व उद्घाटन सत्र चे सूत्रसंचालन प्रा.डॉ. मनीषा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन परिषदेचे समन्वयक प्रा. डॉ. व्ही. जे.पाटील यांनी केले.

 

समारोप सत्र: या परिषदेच्या समारोप सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून मु. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं. ना.भारंबे हे उपस्थित होते. या राष्ट्रीय परिषदेत 51 शोधनिबंध सादर करण्यात आले व दीडशेहूनअधिक संशोधकांनी आपला सहभाग नोंदविला. या सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.गौरी राणे यांनी भूषवले. या राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गौरी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे समन्वयक व उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे, परिषदेच्या सचिव प्रा. डॉ. मनीषा पाटील व प्रा. डॉ. स्मिता चौधरी यांचे सह प्रा. सौ.नंदा बेंडाळे, डॉ. सुहास चौधरी, प्रा.सौ. संध्या फेगडे, प्रा. एच. आर. जाधव, प्रा. आर.पी. मोरे, डॉ. सुजाता गायकवाड, प्रा.पी. एन. भिरूढ, डॉ.ललित पाटील, प्रा. योगेश खैरनार यांच्यासह ईतर प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर सहकारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content