मेहरूण हायमस्ट लॅम्पचे महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते लोकार्पण

जळगाव प्रतिनिधी । दलीत नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत मेहरूण परिसरातील महादेव मंदीराजवळ महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते आज रविवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हायमस्ट लॅम्पचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर कूलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक, सलमान खाटीक, अनिल सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून मेहरूण परिसरात हायमस्ट लॅम्प बसवावी अशी मागणी नागरीकांकडून महापालिकेला मागणी केली होती. महापालिकेने नागरी दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्हा नियोजनाच्या निधी मंजूर करण्यात आला होता. आज रविवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते हायमस्ट लॅम्पचे लोकार्पण करण्यात आले. मेहरूण परिसरात या योजनेंतर्गत नऊ मीटर लांबीचे २१ तर १२ मीटर लांबीचे २ असे एकुण २४ हायमस्ट लॅम्प लवकरच परिसरात लावण्यात येणार आहे अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी बोलतांना सांगितले.

 

Protected Content