



यावल, प्रतिनिधी | केन्द्र शासनाने देशाचा अन्नदाता बळीराजा शेतकरीला संपवणारे काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्याचा हक्क हिरविणाऱ्या आणि आपल्या उघोगपती मित्रांचे खिसे भरणाऱ्या जुलमी अत्याचारी मोदी सरकार विरोधात सोमवारी २७ सप्टेंबर रोजी भारत बंद आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कळविण्यात आले आहे.
सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता यावल शहरातील भुसावळ टी पॉईंट जवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संयुक्तरित्या भारत बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्यातील पक्षातील सर्व पधदिकारी कार्यकर्ता आणि शेतकरी बांधव यांनी यात मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे व काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले सर , नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह दोघ पक्षातील पदाधिकारी यांनी केले आहे.


