यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरात कामधंदा येत नाही म्हणून विवाहितेला मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील न्हावी येथील फरजानाबी अशपाक शेख याचा विवाह शेख अशपाक शेख मुश्ताक याच्याशी लग्न झालेले आहे. दरम्यान, लग्न झाल्यापासून विवाहितेला किरकोळ कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. लग्न झाल्यापासून अशपाक शेख हा काहाही कामधंद करत नाही, म्हणून विवाहितेने कामाला जायला सांगितले, याचा राग आल्याने पती शेख अशपाक शेख मुश्ताक, तौसिफ शेख मुश्ताक, समीर शेख मुश्ताक आणि शमिम मुश्ताक शेख यांनी मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता माहेरी निघून आल्यात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख अशपाक शेख मुश्ताक, तौसिफ शेख मुश्ताक, समीर शेख मुश्ताक आणि शमिम मुश्ताक शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ विजय पाचपोळ करीत आहे.