किरकोळ कारणावरून तरूणाला बदडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काशिनाथ चौक परिसरातील रंग लावू दे नाही तर दारु पाज असे दोघांनी तरुणाला सांगितले, मात्र तरुणाने दोन्ही गोष्टींना नकार दिल्याचा राग आल्याने दोघांनी तरुणाला चापटाबुक्क्यांनी मारहाण करत तोंडावर दगड मारुन दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रविवार १२ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसीतील जी सेक्टर येथे भाग्यलक्ष्मी इंडस्ट्रीज येथे महेश संतोष मुंदडा वय २३ हा तरुण वास्तव्यास आहे. तो व्यवसाय करतो. ७ मार्च रोजी धुलीवंदनच्या दिवशी महेश मुंदडा हा काशिनाथ चौक परिसरात असतांना, अक्षय कैलास कुंभार व भुषण ऊर्फ भगवान पाटील हे दोघे आले, दोघांनी महेश यास रंग लावू दे नाही, तर दारु पाज असे सांगितले, महेशने नकार दिला असता, अक्षय व भुषण या दोघांनी महेश यास चापटाबुक्क्यांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत तोंडावर दगड मारुन दुखापत केली. याप्रकरणी पाच दिवसानंतर महेश मुंदडा याने रविवार, १२ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अक्षय कैलास कुंभार रा. प्रजापत व भुषण ऊर्फ भगवान पाटील रा. मेस्कोमाता नगर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील हे करीत आहेत.

Protected Content