अपघातात जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महामार्गावरील नशिराबाद पुलाजवळ अपघात होऊन जखमी झालेल्या  परप्रांतीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना  घडली. याप्रकरणी मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, जितेंद्रकुमार धनपतीसा गुप्ता (२०, रा. भरखरा, जि. बक्सार, बिहार)  यांचा जळगाव तालुक्यातील नशिराबाद पुलाजवळ अपघात होऊन त्यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना जळगाव शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना २० ऑक्टोंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख करीत आहेत.

Protected Content