जळगाव-लाईव्अ ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा भागातील सोमानी मार्केट जवळील आदित्य पान सेंटरची दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सोमवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश सुकदेव नरवाडे (वय-४८) रा. इंद्रनिल सोसायटी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केट येथे आदित्य पान सेंटर नावाचे दुकान आहे. पान टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे रविवारी १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता त्यांनी दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद पान सेंटरचे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. सोमवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता ते दुकानात गेले असता त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.