बस वाहकासह चालकाला मारहाण करणे भोवले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खेडी पेट्रोल पंपाजवळ बस अडवून बस वाहकासह चालकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या एकाला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालायाने सहा महिने सक्तमजूरी आणि ५०० रूपयांचा दंडाची शिक्षा सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की, भुसावळ बस आगाराची बस २६ एप्रिल २०१८ रोजी भुसावळ- सुरत साठी जात असतांना जळगाव शहराजवळील खेडी गावाच्या पेट्रोलपंपाजवळून जात असतांना दुचाकी वरील नवनाथ आसाराम शिंदे रा. रामनगर, जळगाव याने रस्त्यावर दुचाकी आडवी लावून बस अडविली. व काहीही कारण नसतांना बसचालक व वाहक दिपक रामकृष्ण बडगुजर यांना बेदम मारहाण करून वाहकाजवळील १ हजार रूपये जबरी हिसकावून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवनाथ शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमुर्ती शरद पवार यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये सरकार पक्षातर्फे सहा साक्षिदार तपासण्यात आले. यात वाहक, चालक, वैद्यकीय अधिकारी आणि पंच यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने नवनाथ शिंदे याला दोषी ठरवत सहा महिने सक्तमजूरी आणि ५०० रूपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे

Protected Content