Home क्राईम नागसेन नगरातील तरूणावर धारदार वस्तूने वार केल्याने गंभीर जखमी

नागसेन नगरातील तरूणावर धारदार वस्तूने वार केल्याने गंभीर जखमी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून नागसेन नगरातील २८ वर्षीय तरूणाला पाच जणांनी धारदार वस्तूंसह लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घडना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मुकेश रोहिदास झाल्टे (वय-२८) हा तरूण आपल्या परिवारासह शहरातील नागसेन नगरात वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा दुकानजवळ उभा असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून गोपाल नरेंद्र पाटील, विठ्ठल अशोक सोनार उर्फ मोरे, विजय अशोक सोनार, रतिलाल नरेंद्र पाटील, अमोल गुजर सर्व रा. रामेश्वर कॉलनी यांनी फरशी, चॉपर, लोखंडी रॉड, दारूची बाटली आणि काठी याने बेदम मारहाण करून डोक्याला, हाताला, मानेला आणि पाठीला गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या मुकेशला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मुकेशने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गोपाल नरेंद्र पाटील, विठ्ठल अशोक सोनार उर्फ मोरे, विजय अशोक सोनार, रतिलाल नरेंद्र पाटील, अमोल गुजर सर्व रा. रामेश्वर कॉलनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.


Protected Content

Play sound