वाकडी येथे दोन दुकाने फोडून रोकड लांबविली

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वाकडी येथील दोन दुकाने फोडून ३६ हजार ९७० रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील वाकडी येथील रहिवाशी अभय भगचंद जैन यांचे वाकडी येथे तोंडापूर रस्त्यावर अरीहंत ॲग्रो दुकान आहे. कृषि विषयक सामान विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान दुकान बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरची पट्टी तोडून आत प्रवेश करत गल्ल्यातील रोकड लांबविली. त्याच प्रमाणे त्यांच्या दुकानाच्या शेजारी भरतसिंग राजपूत यांचे देखील राधा ट्रेंडींग दुकान फोडले. दोन्ही दुकानातून एकुा ३६ हजार ९७० रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अभय जैन यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण शिंपी करीत आहे.

Protected Content