गाडी लावण्यावरून विद्यार्थ्यावर धारदार चाकूने वार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ गाडी लावण्याच्या कारणावरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ३ ते ४ जणांनी धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, आर्यन अजय पाटील (वय-१६) रा. दांडेकर नगर, जळगाव हा विद्यार्थी आईवडील व बहिणीसोबत वास्तव्याला आहे. शहरातील काशिनाथ पलोड या शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आर्यन हा दुचाकीने खासगी क्लाससाठी मित्र सोहम इखनकर याला घेण्यासाठी सेंट जोसेफ शाळेजवळील मिनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स येथे आला. त्याठिकाणी आगोदरच तीन ते चार जण उभे होती. त्यावेळी अनोळखी तरूणांनी इथे दुचाकी लावू नको असे सांगून आर्यनला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर एकाने पाठीत चाकूने वार केला व सर्वजण घटनास्थळाहून पसार झाले. जखमी अवस्थेत आर्यनच्या मित्रांनी त्यांला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी आर्यनने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता अज्ञात ३ ते ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.

Protected Content