जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गांधी नगरात असलेल्या गोकूळ हॉस्पिटल येथील एका डॉक्टरची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अभिजित रविंद्र काळबांधे (वय-२५, रा. गांधी नगर, जळगाव) हे गोकूळ हॉस्पिटल येथे निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ सीए ०६३९) आहे. रविवारी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता नेहमीप्रमाणे दुचाकी गोकुळ हॉस्पिटलच्या आवारात पार्कींग करून लावलेली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षा आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे.