गॅरेजमध्ये उभ्या डंपरला अचानक लागली आग !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते भुसावळ रोड वरील दुरदर्शन टॉवर नजीक असलेल्या एका गॅरेजमध्ये उभे असलेल्या डंपरला अचानक आग लागल्याची घटना मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

अधिक माहिती अशी की, शहरापासून जवळ असलेल्या दुरदर्शन टॉवर समोर असलेल्या आनंद सर मोटर बॉडी रिपेरिंग गॅरेज मध्ये डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ५८८८) उभा होता. सोमवारी १६ जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उभ्या डंपरला अचानक आग लागली. आग लागल्याची घटना घडल्यानंतर जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाला बोलवण्यात आले. या फायर फायटरच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. अग्निशमन विभागाचे चालक संतोष तायडे, फायरमन रविंद्र बोरसे, पन्नालाल सोनवणे यांनी सहकार्य केले. ही आग नेमकी कश्यामुळे लागली हे अजून समजू शकले नाही. याप्रकरणी अद्याप पोलीसात कुठेही नोंद करण्यात आलेली नाही.

 

Protected Content