Snake bite : सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किरकोळ काम करत असतांना ५० वर्षीय प्रौढ व्यक्तीला सर्प दंश झाल्याने उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अरूण मोहन वाडेकर (वय-५०) रा. गाळण ता. पाचोरा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार २६ एप्रिल रोजी दुपारी शेतात किरकोळ कामे करत असतांना त्यांना सापाने दंश केला. दरम्यान, त्यांच्या सोबत असलेला त्यांचा भाचा प्रविण उत्तमराव वाघ यांनी तातडीने मामाला खासगी वाहनाने पाचोरा  ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषीत केले. डॉक्टरांच्या खबरीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!