जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्रध्दा वालकर या तरूणीची निर्घृण खून करणाऱ्या आफताब पुनावाला याच्या विरोधात जलद न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शहरातील मौलिक अधिकार मंचच्या वतीने शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालघर येथील आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत होता. श्रद्धाने लग्न करण्याविषयी त्याच्याकडे आग्रह धरल्यानंतर आफताबने तिची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. ही घटना अतिशय सुन्न करणारी असून देशभरातील तरुणींमध्ये दहशत निर्माण झाले आहे. तर देशात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. याच पद्धतीने देशात लव्ह जिहादच्या नावाखाली अनेक तरुणींना आपला जीव गमवावा लागत आहे. व दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत चालले आहे. त्यामुळे प्रशासनाने श्रद्धा वाडकर हिची हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी, असे प्रकार पुन्हा होणार नाही यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र पथक तयार करावे, लवकरात लवकर ‘लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर बंदी कायदा’ लागू करण्यात यावा. उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करण्यात यावी, यासह आदी मागण्यांसाठी मौलिक अधिकार मंचच्यावतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर फारूख शेख , जहॉगिर खान, जाकीर पठाण, मजहर पठाण, पप्पू शेख, मुजाहिद खान, तनविर शेख , शेख अहमद हुसेन, शाहीद सैय्यद, अनवर खान, अमजद पठाण यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.