Home Cities जळगाव महापालिकेसमोर शिवसेनेच्या मयत महिला पदाधिकार्‍यांना ठाकरे गटातर्फे आदरांजली

महापालिकेसमोर शिवसेनेच्या मयत महिला पदाधिकार्‍यांना ठाकरे गटातर्फे आदरांजली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या दुर्गाताई शिंदे-भोसले यांचे नुकतेच अकाली निधन झाल्याने शुक्रवारी ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता महापालिकेसमोर जळगावातील ठाकरे गटाच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

 

याबबात अधिक माहिती अशी की, युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले -शिंदे यांना ठाण्यातील महाविकास आघाडीच्या जनप्रक्षोभ मोर्चात चालत असतानाच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तात्काळ मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अशी दुर्गा भोसले – शिंदे यांची ओळख होती. युवा शिवसेनेच्या माध्यमातून राज्यभरात संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोठा हातभार होता. त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगाव शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेसमोर श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला.

 

याप्रसंगी शहराध्यक्ष शरद तायडे, युवासेनेचे विराज कावडीया, पियुष गांधी, विशाल वाणी, अमोल मोरे, यश सपकाळे, अमित जगताप, गिरीश कोल्हे, राहूल शिंदे, अजिंक्य कोळी, जय मेहता, प्रितम शिंदे, निलू जोशी, पंकज जोशी, बिपीन पवार, यश राठोड, हर्षल मुंडे, सुनिल ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound