पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील बाहेरपुरा व कुर्बान नगर भागातील महिला व पुरुष शौचालय ही अतिशय जिर्ण असुन भविष्यात केव्हाही खाली पडण्याची दाट शक्यता असल्याने जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसून शौचालय व बाथरुमला चक्क दरवाजेच नाहीत. यासोबतच अशा विविध समस्यांबाबत आज स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांनी निवेदन दिले.
यासोबतच शौचालयात व परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असतांना ही संबंधित ठेकेदार शौचालय व बाथरुम वापरणाऱ्यांकडुन जास्तीचे पैसे घेत आहे. बाहेरपुरा व कुर्बान नगर येथील शौचालयाची दुरुस्ती करुन सदर शौचालयाचा ठेका हा रद्द करुन स्थानिक गोर-गरिबांसाठी शौचालय मोफत करण्यात यावे. सदरचे निवेदन प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले यांनी स्विकारले. निवेदन देते प्रसंगी इसराईल खान, जावेद शेख शफी, अरऊफ करीम टकारी, इमरान पठाण, शौकत इसा टकारी, सैय्यद तारीक सैय्यद बशीर, सईद शब्बीर शेख, गफ्फार गयास, निहाल गफ्फार बागवान, फारुक दगडु पिंजारी, सलिम शेख उपस्थित होते.