चिंताजनक : पुणे महापालिकेच्या ५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू ; ४८ कर्मचारी बाधित

पुणे (वृत्तसंस्था) पुणे महापालिकेतील ५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, आजरोजी पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 107 वर पोहोचली आहे.

पालिकेच्या सेवेत असलेल्या व कोरोनाबाधित झालेल्यांमध्ये सर्वाधिक आकडा हा सफाई कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांच्यासोबत शिपाई, बिगारी, लिपिक, बहुद्देशीय कामगार, आरोग्य निरीक्षक, वाहन चालक, बालवाडी शिक्षिका आणि नर्सेसचाही यात समावेश आहे. यापैकी ३७ कर्मचारी हे महापालिकेच्या कायम सेवेतील असून ११ कर्मचारी कंत्राटी आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत ५ महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, यापैकी ४ सफाई कर्मचारी असून एक आया आहेत. उर्वरीत ४३ कर्मचाऱ्यांपैकी २४ कर्मचारी हे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे़ तर अद्यापही १९ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. आज पुण्यात 208 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 107 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात एकूण 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत 227 कोरोनाबळी ठरले आहेत.

Protected Content