डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील कोळवद येथे महर्षी वाल्मिक क्रिकेट क्लबद्वारे आयोजित खुल्या प्लास्टीक बॉल क्रिकेट स्पर्धाचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर या उद्धघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल गोविंदा पाटील हे होते.

 

प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सरपंच व परिसरातील मान्यवर मंडळी हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक महर्षी क्रिकेट क्लबच्या वतीने अतिथींचे पुष्यगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वानखेडे सरांनी केले तर , प्रमुख उपस्थित मान्यवरांचे आभार अक्षय पाटील यांनी मानले. याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील , डॉ. कुंदन फेगडे, मा. सरपंच कोळवद संजय कोळी, सरपंच जाऊबाई भिल , पांडुरंग पाटील, गोविंदा सावळे, भागवत पाटील, आशिष मोरे, राजेंद्र सूर्यवंशी, मधुकर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, राजरत आढाळे, दिपक पाटील , विकी मोरे, इकबाल तडवी, सागर लोहार, विशाल बारी, संजय फेगडे, आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेला हर्षल सोनवणे, इकबाल तडवी, तुषार चौधरी, संदीप कोळी, यशोदीप भिरूड, फारूक तडवी शाहरुख तडवी , गणेश कोळी, जावेद तडवी, राहुल कोळी यांचे सहकार्य लाभले या स्पर्धेचे आयोजन मयराफ तडवी, दिपक कोळी , धनराज कोळी, चेतन कोळी राजू तडवी यांनी केले असुन, या स्पर्धत यावल तालुक्यातुन एकुण ३० संघाची सहभाग भाग घेतला आहे ..

Protected Content