पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात एक बेघर वेडसर महिला भटकत असल्याची माहिती महिला दक्षता कमिटीच्या सदस्यांनी पोलिसांना कळवली असतात पोलिसांनी सतर्कता दाखवत त्या महिलेसं पोलीस स्टेशनमध्ये आणून तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.
पारोळा शहरात बेवारसपणे एक महिला फिरत असल्याची माहिती महिला दक्षता कमिटी सदस्या सुवर्णा पाटील, अन्नपूर्णा पाटील यांनी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना दिली. तात्काळ वाकोडे यांनी एपीआय रवींद्र बागुल, पो. ना. संदीप सातपुते, होमगार्ड चेतन पाटील यांना त्या महिलेस पोलीस स्टेशनला घेवून येण्याच्या सूचना दिल्यात. त्या महिलेस पोलीस स्टेशनला आणले असता तिला तीचे नांव गावाची विचारणा केली असता तीला ती काहीएक सांगत नव्हती. यावेळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनीही विचारपूस केली असता ती काहीएक बोलत नव्हती.यामुळे श्री. वाकोडे यांनी तिला पेन व वही देत तुझे नाव पत्ता लिहून दाखव असे सांगितले. यावेळी महिलेने तिचे नाव छाया मोहन भिलवेकर (वय २७ वर्ष नांदूरकला जिल्हा बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश) असे लिहून दिले. श्री. वाकोडे यांनी खकणार पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क करून माहिती देण्याबाबत कळविले आहे. त्या महिलेची पारोळा कुटीर रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी करून तिला अमर सेवा केंद्र वेले, ता. चोपडा येथे दाखल करण्यात आले आहे.