जळगावात विशेष लोक अदालतचे यशस्वीरित्या आयोजन

जळगाव प्रतिनिधी | जळगाव विशेष लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होतं. हे आयोजन यशस्वीरित्या संपन्न झालं.

गुरुवार, दि. २० जानेवारी २०२२ रोजी विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हाध्यक्ष तथा प्रमुख जळगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांच्या हस्ते विशेष लोक अदालतचं उद्घाटन करण्यात आलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली खाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय जळगाव येथे विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलं होतं.

या विशेष अदालतीमध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे मोठ्या प्रमाणात प्रकरणे निकाली निघाले आणि लाखोंच्या संख्येने रकमांची वसुली करण्यात आली. सदर लोक अदालतीमध्ये पॅनल म्हणून भुसावळचे माजी सेवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस पी डोरले, पॅनल सदस्य म्हणून अॅड.एस जे पाटील, अॅड.रूपाली कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.

विशेष लोकअदालतमध्ये जळगाव विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हाध्यक्ष तथा प्रमुख जळगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी आणि जळगाव विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.ए.के.शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विशेष लोकजागृतीच्या यशस्वीसाठी मार्गदर्शन केलं.

लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी जळगाव विधी सेवा प्राधिकरणाचे अविनाश कुलकर्णी, लिपिक प्रमोद पाटील, चंद्रवदन भारंबे, गणेश निंबोळकर, प्रकाश काजळे, भालचंद्र सैंदाणे आरिफ पटेल, ऐश्वर्या मंत्री, समांतर विधी सहाय्यक तसेच बँक पॅनल वकील अॅड.जाधव आणि बँकेचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले

Protected Content