चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील शिक्षकाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहुणबारे पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, मुकेश धनराज पाटील (वय-५६ रा. खेडे खुर्द ता, चाळीसगाव ह.मु. शिवाजीनगर पुणे) हे शिक्षक म्हणून नोकरीला आहे. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते २७ ऑक्टोबर रात्री ८ वाजता दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहून बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याची समोर आले आहे. तसेच प्रॉपर्टीचे कागदपत्र, इन्शुरन्सचे कागदपत्र, बँक पासबुक, एटीएम कार्ड देखील चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर मुकेश पाटील यांनी तातडीने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहे.