नागपूर-सोलापूर एक्सप्रेसला चाळीसगाव येथे थांबा द्या : रयत सेना

चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नागपूर-सोलापूर एक्सप्रेसला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा अशा मागणीचे निवेदन रयत सेनेतर्फे डीआरएम यांना देण्यात आले आहे.

नागपूर ते सोलापूर रेल्वे गाडी रेल्वे विभागाच्या वतीने गेल्या तिन महिन्यांपासून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या गाडीला भुसावळ नंतर मनमाड स्थानकावर थांबा असल्यामुळे चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गाडी थांबत नाही. परिणामी पंढरपूर येथे विठ्ठल रुख्मिणी दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना या गाडीची सोय होत नाही म्हणून नागपूर ते सोलापूर रेल्वे गाडीला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावी यासह इतर मागण्याचे निवेदन भुसावळ विभागाचे मंडल रेल प्रबंधक एस. एस. केडीया यांना रयत सेनेच्या देण्यात आले आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, चाळीसगाव रेल्वे स्थानक हे तीन जिल्ह्याच्या सीमेवर असून या स्थानकावरून हजारो प्रवासी प्रवास करत असतात मात्र पाहिजे तेवढ्या रेल्वे गाड्याना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याने प्रवाशांची प्रवास करण्यास मोठी गैरसोय होत असते.म्हणून चाळीसगाव रेल्वे स्थानकावर न थांबता धावणार्‍या गाडी नं. ०१४३३ व ०१४३४ नागपुर से सोलापुर एक्सप्रेस ला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा. तसेच गाडी नं. ०११३५ व ०११३६ भुसावल ते दौंड पर्यंत धावणार्‍या गाडीला पंढरपुर पर्यंत दोन स्थानका पर्यंत वाढविण्यात यावे . तर गाडी नं. ११११३ देवळाली भुसावल एक्सप्रेस चा पूर्वीच्या वेळेवर पूर्ववत करण्यात यावी यासह गाडी न १५०१८ काशी एक्सप्रेसचा पूर्वीचा वेळ १२ वाजेचा होता तो पूर्ववत करण्यात यावा सध्यस्थितीत काशीचा वेळ ११ ,१० वाजता आहे. जेणेकरून विद्यार्थी, नोकरवर्ग, व्यापारी,भाविक भक्तांना या गाड्यांनी प्रवास करण्याची सोय होणार आहे.

वरील सर्व मागण्या रेल्वे विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात येउन प्रवाशांची सोय करण्यात यावी यासाठी भुसावळ विभागाचे मंडल रेल प्रबंधक एस एस केडीया यांना रयत सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते,बाळासाहेब पवार, रयत सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड ,तालुका उपाध्यक्ष भरत नवले, सामाजिक कार्यकर्ते,उदय देशपांडे, मिलिंद लोखंडे यांच्यासह रेल्वे प्रवाशांच्या सह्या आहेत.

Protected Content