आ. गिरीश महाजन यांच्याकडून महापूरग्रस्तांसाठी मदत रवाना

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यातर्फे कोकणातील महापूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार्‍या पॅकेटच्या स्वरूपातील मदत आज जीएम फाऊंडेशनच्या कार्यालयातून रवाना करण्यात आली.

याबाबत वृत्त असे की, सध्या कोकणात पावसामुळे अतिशय बिकट परिस्थित निर्माण झाली आहे. यात विशेष करून महाड व चिपळूण तालुक्यात अक्षरश: हाहाकार उडाल्याचे दिसून येत आहे. आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर व आमदार निरंजन डावखरे यांच्यासह चिपळूण येथे मदतकार्यासाठी पुढाकार घेतला आहे.

दरम्यान, असंख्य महापूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याची दखल घेऊन आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार्‍या तब्बल दहा हजार पॅकेटच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. आज जळगाव येथील जी. एम. फाऊंडेशनच्या कार्यालयातून ही मदत महाड आणि चिपळूण येथे रवाना करण्यात आली.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जळगाव महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, जामनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, माजी सभापती नवले पाटील रवींद्र झाल्टे, नगरसेवक विशाल त्रिपाठी, सुचिता हाडा, महेश जोशी, किशोर चौधरी, उज्वलाताई बेंडाळे, दीपमाला काळे, धिरज सोनवणे, अजित राणे, जयश ठाकूर, आनंद सपकाळे, मनोज काळे, मनोज भांडारकर, अक्षय चौधरी, मयूर कापसे, होनाजी चव्हाण, कुशल पाटील, पितांबर भावसार जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख आदी उपस्थित होते

 

Protected Content