अमळनेर ते शेगाव पायी वारी प्रस्थान!

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरासह ग्रामीण भागातील गजानन महाराज भक्तांची गेल्या दहा वर्षासून अमळनेर ते शेगाव पायी वारी जाते. यावर्षीही सुमारे ४०० भाविकाची पायी वारी अमळनेर येथील दादासाहेब जी.एम. सोनार नगर येथून रविवारी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता प्रस्थान झाली असून 3 नोव्हेंबर रोजी शेगाव पोहचणार आहे.

यावेळी पहाटे ५.३० वाजता गजानन महाराज मंदिरात आरती करण्यात आली. अशोक भावे महाराज, नितीन भावे,गजानन महाराज मंदिराचे वारी प्रमुख सेवानिवृत प्रा. आर बी पवार, ज्योती पवार, सेवेकरी रघुनाथ पाटील यांनी महापूजा करीत पायी वारीला सुरुवात केली. यावेळी अमळनेर तालुक्यातील, पारोळा तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर काही भाविक पायी वारीला रात्री मंदिरात मुक्कामी होते. सकाळी ७ वाजता बँडच्या वाद्यात भजनाच्या ताला सुरात शहरातून वाजत गाजत पायी वारी निघाली. याप्रसंगी चौकात चौकात पालखीची पुजा करीत दारापुढे रांगोळी काढीत स्वागत करण्यात आले. रविवार 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान सामाजिक कार्यकर्ते, भक्त यांच्या सहकार्याने पायी वारीत भक्तना चहा, जेवण व मुक्कामाची सोय केली आहे. यावेळी डांगरी, सात्री, मारवड, कळमसरे, पातोंडा, अंमळगाव,पिंगळवाडे सुमठाणे,तामसवाडी,यांच्यासह अमळनेर शहरातील सुमारे चारशे भाविक यावेळी पायीवारीत सहभागी झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून पायी वारी साठी नियोजन करण्यात आले होते.यासाठी आर. बी. पवार सर , ज्योती पवार, नितीन भावे, चेतन उपासनी, रवी उपासनी, परेश पाटील, डॉ. जिजाबराव पाटील,मोहीत पवार, आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content