चोपडा शहरात ‘संविधान दिन’ साजरा

chopada 1

चोपडा प्रतिनिधी । येथील भगिनी मंडळ चोपडा संचलित, ललित कला केंद्र आणि याचबरोबर महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्र विभाग, बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर अभ्यासकेंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने “संविधान दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ललित कला केंद्र प्रथमतः प्राध्यापक संजय नेवे यांनी सुरुवातीला संविधान म्हणजे काय ते कधी व कोणी लिहिले याविषयी थोडक्यात माहिती दिली. तसेच जगात सर्वात मोठी भारताची राज्यघटना असून तिचा सर्वांनी आदर केला पाहिजे. याविषयी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर प्राध्यापक नेवे यांनी राज्यघटनाची शपथ म्हणजे उद्देशिका वाचन केले. त्यामागोमाग प्रत्येक विद्यार्थ्यांनी ती उच्चारून शपथ घेतली. याचबरोबर प्राध्यापक साळी यांनीदेखील प्रतिज्ञाचे वाचन करून घेतले. शेवटी राष्ट्रगीतानंतर समारोप करण्यात आला. याप्रसंगी ए.टी.डी, फाउंडेशन आणि जी.डी.आर्ट या तिन्ही विभागातील विद्यार्थी आणि तसेच प्राध्यापक विनोद पाटील, लिपिक भगवान भारी, सेवक अतुल अडावदकर आणि प्रविण मानकरी हजर होते.

याचबरोबर कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालयात संविधान दिननिमित्त स्मार्ट हॉल येथे सकाळी ९.३० वाजता आयोजित संविधान जागर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मानवमुक्तीच्या ऐतिहासिक संघर्षाचे सुवर्ण फळ म्हणजे संविधान असून बाबासाहेब आंबेडकरांच्या कठोर परिश्रम, अभ्यास, त्याग, बलिदान आणि समर्पणातून आकाराला आलेल्या व भारतीयांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आधीनियमित व अंगीकृत केलेल्या संविधानामुळेच हजारो वर्षांच्या गुलामीच्या शृंखला गळून पडल्या असल्याचे मत चोपडा पं.स. शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी यांच्या हस्ते बाबासाहेब डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, योगेश साळुंखे रा.से.यो. व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.दिलीप सपकाळे आदी मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.दत्तात्र कर्दपवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.भूषण पवार यांनी केले तर आभार प्रा.दिलीप सपकाळे यांनी मानले. कार्यक्रमाला केंद्रसंयोजक प्रा.संदीप पाटील, डॉ.शैलेश वाघ, प्रा.विशाल हौसे, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.एस.टी. शिंदे, प्रा.दीनानाथ पाटील, डॉ.प्रकाश लभाणे, प्रा.विशाल पाटील, प्रा.विवेकानंद शिंदे, प्रा.सुनिता पाटील, प्रा.सुनंदा नन्नवरे, प्रा.अनिता सांगोरे, प्रा.मुकेश पाटील, प्रा.अभिजित साळुंखे, प्रा.अभिजित पाटील आदींसह विद्यार्थी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content