चैतन्य तांडा येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेला सुरुवात

चाळीसगाव प्रतिनिधी ।  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील चैतन्य तांडा येथे आज या मोहिमेला सुरुवात करण्यात आले असून प्रत्येक कुटूंबाची माहिती संकलित केली जात आहे. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यात बदल करून मी जबाबदार ह्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नुकतीच २८ एप्रिल ते २ मे दरम्यान जिल्हाभरात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा क्र. ४ येथे २८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता या मोहिमेला प्रारंभ करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत प्रति कुटुंबाचे माहिती घेतली जाणार आहे. गावात येत्या २ मे पर्यंत  सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका शोभा राठोड व  आशा सेविका कविता जाधव यांच्याकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मोहिमेला ग्रामपंचायतीतून आज सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, डॉ. घनश्याम राठोड, आरोग्य सेवक संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, ग्रामसेवक कैलास लोटन जाधव व जेष्ठ नागरिक महिला शेवंताबाई राठोड आदी उपस्थित होते.

 

Protected Content