पाचोरा येथे कानबाई उत्सव हर्षोल्हासात साजरा (व्हिडीओ)

kanbai

 

पाचोरा प्रतिनिधी । खान्देशात श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर येणारा पहिला रविवार हा कानबाई उत्सवाने साजरा करण्यात येतो.

याबाबत अधिक माहिती अशी की, कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली असून कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तुझ्या नावाची म्हणजे “खानबाई’ साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा होत असतो. या उत्सवाच्या आधीही दिवाळ सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या सणाच्या आधीही घराला रंगरंगोटी केली जाते. तसेच कुटुंबात रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु, चण्याची दाळ घेवून भोजन तयार केले जाते. कानबाई नारळ मुख्यत: पुर्वापार चालत आलेले असते. या उत्सावाला सायंकाळी सुरुवात केली जाते. सकाळी भजनी मंडळामार्फत मिरवणूक काढण्यात येते. यावेळी महिला मुली
फुगळीसह जुने खेळ खेळले जातात. त्यानंतर पाचोरा कृष्णापुरी शिव पाचाळेश्वर मंदिरात उत्सव पार पाडतो.

Protected Content