यावल शहरात पादचाऱ्याचा हातातील मोबाईल लांबविला

यावल प्रतिनिधी । शहरात रात्री सुमारास पायी जाणाऱ्या तरूणाच्या हातातील मोबाईल अज्ञात चोरट्याने दुचाकीवरून येवून लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात तक्रार दिली आहे. 

अधिक माहिती अशी की, विजय सुधाकर कोष्टी (वय-३०) रा.फालक नगर हात तरूण रात्री ८ वाजेच्या सुमारास भुसावळ टी पाईंट येथे आपल्या घरी येत असतांना मोबाईल कुणाशी बोलत होता. त्याचवेळी मागुन अचानक दुचाकीवर येवून दोन भामट्यांनी तरूणाच्या हातातील १३ हजार रूपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल हिसकावुन भुसावळ मार्गावर पोबारा केल्याची घटना घडली आहे. दरम्यान जळगाव शहरात एक मोठी टोळी ही पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावुन पळ काढण्यात येत असल्याच्या अनेक घटना घडल्या असुन , मोबाइल घेवुन पळणारे हे यावल कडे सक्रीय झाले आहे. याप्रकरणी तरूणाने यावल पोलीसात मोबाईल चोरी प्रकरणी तक्रार दिली आहे. 

 

Protected Content