जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा भागात असलेल्या केदार नगरातून एकाची ११ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत सोमवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन मधुकर पराये (वय-२६) रा. केदारनगर, पिंपळा, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात रविवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रोहन हा त्याचा भाचा गौरव मुर्हेकर याच्यासोबत पिंप्राळा बाजारातील समर्थ क्लिनिक येथे दुचाकी एमएच १९ डीएम ६१४४) ने गेले. त्यावेळी रोहनने त्याची दुचाकी ही दवाखान्यासमोर पार्क करून दवाखान्यात गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु कुठेही दुचाकी मिळाली नाही. परिसरातील सीसीटीव्हीत दोन जण दुचाकीने जातांना आढळून आले आहे रोहन पराये यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सोमवार २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.