गिरणा धरणातून २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; सतर्कतेचा इशारा

download 2 1

 

जळगाव (प्रतिनिधी) तब्बल 12 वर्षांनंतर पहिल्यांदा गिरणा धरण 100 टक्के भरले आहे. सध्या धरणातून २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

 

नाशिक जिल्ह्याच्या काही भागात व धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आज सकाळी 5 वाजेपासून गिरणा धरणात पाण्याच्या येव्यात वाढ होत आहे. त्यामुळे येत्या 24 तासात धरणातील विसर्ग15000 ते 20000 cusecs पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे. असे हेमंत व्ही, पाटील, उप विभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी कळविले आहे. दरम्यान, सकाळी अकरा वाजता गिरणा धरणातुन 20 हजार क्युसेस वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Protected Content