भुसावळ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ‘ईडी च्या कारवाईचा निषेध (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 09 26 at 1.39.48 PM

भुसावळ, प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षांचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सूडबुद्धीने ईडी मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा निषेध भुसावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे करण्यात आला. यासंदर्भात तहसिलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले.

ईडीची कारवाई ही पक्ष अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या मिळत असलेला पाठिंबा बघून करण्यात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळेच ईडी मार्फत अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा भुसावळ तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष दीपक मराठे, गटनेता उल्हास पगारे, शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सदस्य विजय अवसरमल, भगवान धांडे, संतोष माळी, मुन्ना सोनवणे, शोएब खान, नाजीम कादरी, रवींद्र चौधरी, बाळू गोतांडे, दिनकर राऊत, अमजल खान मुर्ताब खान , माधुरी पाटील, शारदा कोळी, विश्वास चौधरी, अशोक पाटील, सुजितसिंग चितोडिया आदी उपस्थित होते.

Protected Content