चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी तपासणीत पोलिसांच्या पथकाला मध्यप्रदेशातील बलवाडी येथून चोपडा मार्गे जळगावकडे जाणाऱ्या हुंडाई व्हेन्यू गाडीत ३० लाखांची रोकड आढळून आल्याने पोलिसांनी रोकड जप्त करून संबंधितांवर कारवाई केली.
२४ ऑक्टोबर रोजी रात्री ००.३० वाजता तिरंगा चौकात होंडाई व्हेन्यु कंपनीची गाडी क्रमांक एम. पि. ०९ सी के. ७४७४ हिच्या मध्ये ३०,००,००० रुपये (५०० रुपये दराचे १५, लाख रुपये, २०० रुपये दराचे ६ लाख रुपये, १०० रुपये दराचे ९, लाख रुपये) असे इसम नामे (१) इम्रान अल्लाउददीन मन्सुरी वय ४४ रा. बलवाडी ता. वरला जि. बडवाणी मध्यप्रदेश (२) अजय अरुण पाटील वय ३२ रा. जयहिंद कॉलनी चोपडा असे वरील रक्कम बलवाडी कडुन जळगाव कडे चोपडा मार्गे जात असतांना तिरंगा चौकात श्रीनाथ प्राईड हॉटेल समोर मिळुन आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर पहिल्यांदा एवढी मोठी रक्कम शोधण्यास पोलीसांना यश आले. दरम्यान ही रोकड काय कामासाठी वापरली जाणार होती याबाबत पोलीस तपास करीत आहेत.