धरणगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात स्वातंत्र्याच्या ७५ वा आजादी का अमृत महोत्सवानिमित्त होमगार्ड पथकाद्वारे रॅली, पथसंलन, वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने जिल्हा समादेशक होमगार्डस् तथा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या आदेशानुसार त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव, केंद्रप्रमुख संदीप तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार होमगार्डस् पथक धरणगावमार्फत विविध कार्यक्रम घेण्यात आलेत. यात ढोल ताशाच्या गजरात इंद्रा कन्या महाविद्यालयापासून शिवाजी महाराज स्मारक – महात्मा फुले स्मारक- धरणी चौक- बालाजी मंदिर परिसर जंजी बुवा चौक असे अनेक भागातून भव्य रॅली काढण्यात आली. ठीक ठिकाणी वृक्षारोपण वंदे मातरम भारत माता की जय अशी घोषणा देऊन कार्यक्रम करण्यात आला.यावेळी होमगार्डस् पथकातील तालुका समादेशक ईश्वर महाजन अंशकालीन लिपिक जानकिराम पाटील अशोक देशमुख यांनी उत्कृष्ट नेतृत्व केले. पथकातील होमगार्ड भिकन लोहार, सुरेश महाजन, आत्माराम चौधरी ,गिरधर महाजन यांनी अतिशय सुंदर बँड वाद्य सादर केले. वृक्षरोपण स्वप्निल जैन, प्रविण वराडे, निंबा धनगर, राहुल महाजन ,रवींद्र बडगुजर, मनोज जगताप, अनिल महाजन, अनिल सातपुते आदी होमगार्ड हजर होते.