“गुरुगौरव पुरस्कार” पुरस्काराने प्रा.संभाजी पाटील सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी | शिरपूर येथील आर. सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचे आदर्श शिक्षक संभाजी पाटील यांना धुळे येथील धो.शा.गरुड वाचनालय येथे शनिवार दि. २५ डिसेंबर, रोजी महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन या खऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून नाशिक विभागीय स्तराची ओ.बी.सी. शिक्षक असोशिएशन यांच्यातर्फे “गुरूगौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कार्यक्रमाची सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमेचे पूजन एस.के.चौधरी, एस.एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव ईश्वर महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी विद्यार्थी-शिक्षक-पालक विकास असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विलासराव पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मॉडर्न को – ऑपरेटिव्ह बँक चाळीसगावचे चेअरमन अशोक खलाणे यांच्या हस्ते करण्यात आले. गुरुगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.आर.ओ.मगरे, शंकर खलाणे, संतोष माळी, राजेश बागुल, जितेंद्र खैरनार, देवेंद्र पाटील, आर. के. माळी, भरत रोकडे, नितीन शेलार, सुखदेव जाधव, ज्ञानेश्वर माळी, भरत महाजन सर, प्रदीप आहिरे सर, बी.एन.बिरारी, भानुदास माळी, अतुल सूर्यवंशी, गोपाल देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले हायस्कूलचे अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर, सा.मा.शि.प्र.मं.चे अध्यक्ष विजय महाजन, शिरपूरचे नगरसेवक वासुदेव चौधरी, दोंडाईचाचे नगरसेवक प्रवीण जी.महाजन, शिंदखेड्याचे उपनगराध्यक्ष भिलाजी पाटील यांच्या हस्ते “महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन शिक्षक गौरव स्मरणिका – २०२१” चे प्रकाशन करण्यात आले.
गुरुगौरव पुरस्काराचे वितरण धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार प्राप्त स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व पुरस्कारार्थी बंधू-भगिनींचे अभिनंदन व कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली तसेच फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार हाच आमचा आधार, असे प्रतिपादन केले.याप्रसंगी खान्देशातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यातील २८ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये देवगाव देवळी येथील सध्या शिरपूर येथे आर सी पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचे आदर्श शिक्षक संभाजी पाटील,सर यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
तात्यासाहेबांचा स्मृतीदिन हा खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून मला गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे मी करत असलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची पावती आहे. पुरस्काराने बळ व ऊर्जा मिळते. मी ही ऊर्जा घेऊन सातत्याने शैक्षणिक, सामाजिक कार्य करेल व तात्यासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक प्रा.संभाजी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र पगारे सर व आभार ईश्वर महाजन सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओ.बी.सी. विद्यार्थी – शिक्षक – पालक विकास असोसिएशन चे अध्यक्ष, संपूर्ण विश्वस्त मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.संभाजी पाटील यांना गूरुगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र मिञ परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Protected Content