सोमवारी अंतुर्ली- रंजाणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

अमळनेर, प्रतिनिधी | ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना रोजगार संधी उपलब्ध व्हावी, याकरिता प्रथमच सोमवार दि. २७ डिसेंबर रोजी माता बिजासनी अनुदानित आश्रम शाळा अंतुर्ली- रंजाणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

रोजगार मेळावयाचे आयोजन अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील व जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. हा मेळावा अंतुर्ली- रंजाणे माजी सरपंच सुभाषराव पोपटराव पाटील , माजी प्राथ. जि.अध्यक्ष प्रा. नरेंद्र राजाराम सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील , राजेश सुभाषराव पाटील अंतुर्ली यांच्या आयोजनाने व सौजन्याने घेतला जात आहे. या रोजगार मेळाव्यात मोठ्या प्रमाणात मुलां-मुलींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या मेळाव्यात शैक्षणिक पात्रता- १०वी /१२ वी ग्रॅज्युएट /,आयटीआय ट्रेड / डिप्लोमा इंजीनियरिंग असणार आहे. तसेच नोंदणी व ट्रेनिंगसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड ,बँक पासबुक ,व्हॅक्सिन सर्टिफिकेट, शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट फोटो ४ ही कागदपत्रे आवश्यक राहतील असे आयोजकांनी नमुद केले आहे.

Protected Content