जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरणा नदीच्या पुलावरून पायी घरी जात असलेल्या आव्हाणी येथील तरुणाचा पाय घसरून पडल्याने नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची दुदैवी घटना सायंकाळी घडली आहे. रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
संदीप बाजीराव पाटील (वय-४०) रा. आव्हाने ता. धरणगाव असे पाण्यात बुडून वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “संदीप पाटील हा आव्हाणे शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील एका ठेकेदाराकडे कामाला होता. नेहमीप्रमाणे तो आज मंगळवार, दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कामावरून गिरणा नदीच्या पुलावरून पायी जात होता. अचानक त्याचा पाय घसल्याने तोल जावून पाण्यात पडल्याने तो गिरणा नदीच्या वाहत्या पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो पाण्यात बुडाला. हा प्रकार भोकनी गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने पाळधी पोलीस ठाण्याला कळविले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रात्री उशीरापर्यंत शोध कार्य सुरू होते.