तलवारीच्या धाकावर दहशत माजविणाऱ्याच्या नांग्या ठेचल्या

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील जारगाव चौफुली परिसरात बेकायदेशीररित्या हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाच्या नांग्या पोलीसांनी ठेचल्या आहे. लोखंडी तलवार हस्तगत  करून अटक करण्यात आली आहे. विशाल पंकज देसले (वय-२०) रा. जारगाव ता.पाचोरा असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पाचोरा शहरातील जारगाव चौफुली येथे संशयित आरोपी विशाल देसले हा हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पोलीसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपी विशाल देसले याला अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस हवलदार योगेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोहेकॉ सचिन निकम करीत आहे.

Protected Content