कन्हाळा येथे बेकायदेशीर दारू तयार करणाऱ्या तिघांवर गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथील दोन जणांच्या घरात देशी दारू बनविण्याचे साहित्य व सुरू असलेले गावठी हातभट्टी नष्ट करण्यात येवून तीन जणांवर भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यासह राज्यात संचारबंदीचे उल्लंघन करत विनापरवाना गावठी हातभट्टीतून देशी दारू तयार करत असल्याची माहीती भुसावळ तालुका पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास दोन हातभट्टी पोलीसांनी उध्वस्त केली तर एकावर संचारबंदी असतांना विनाकारण फिरतांना आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथील चांदखा चंदू गवळी यांच्या घरात दारू बनविण्याचे नवसागर, कच्चे मिश्रीत ८०० लिटर रसायन व ३५ लिटर दारू असे एकुण १९ हजार १५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर त्याच गावातील बुध्दू गंगा गवळी यांच्याकडे जळत असलेले दारू बनविण्याचे कच्चे रसायन आणि गरम रसायन असे एकुण ३२ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी नष्ट करण्यात आली आहे. तर गावातील एकावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अधिकारी गजानन राठोड यांचा मार्गदर्शनाखाली पो.नि.रामकृष्ण कुंभार, सपोनि अमोल पवार, सफौ सुनिल चौधरी, पोहेकॉ युनुस इब्राहिम शेख, विठ्ठल फुसे, प्रवीण पाटील, प्रेमचंद सपकाळे, शिवाजी खंडारे यांनी केली आहे.

Protected Content