Home क्राईम धरणगावात संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या वीस जणांवर गुन्हे दाखल

धरणगावात संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या वीस जणांवर गुन्हे दाखल

0
111
FIR

धरणगाव प्रतिनिधी । येथे संचार बंदीचे उल्लंघन करणार्‍या २० जणांवर पोलीस स्थानकात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु याचे गांभीर्य लक्षात न घेता अजूनही अनेक जण जमावबंदीचे उल्लंघन करीत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, येथील पोलिसांनी गत दोन-तीन दिवसांपासून कठोर भूमिका घेत, वाहन जप्त करून गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान, आज सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले व सहकार्‍यांनी धरणगावात जमावबंदीचे उल्लंघन करणार्‍या वीस जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईचे शहरातून स्वागत होत असून शहरात विनाकारण करणार्‍यांवर पोलिसांनी अजून कडक कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound