जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माहेश्वरी समाजातील लग्नाला ५० वर्ष पूर्ण झालेले ३१ जोडपे आणि पशु व इतर खाद्य यांची कुटुंबियांसह जळगाव शहर व तालुका महिला संघटनेतर्फे तुला करण्यात आली.
जळगाव शहर व तालुका माहेश्वरीं महिला संघटनेतर्फे आज पांजरपोळ संस्थेच्या गो शाळेत लग्नाला ५० वर्ष पूर्ण झालेले ३१ जोडप्यांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज सकाळपासूनच हा सोहळा मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला.
या सोहळ्यात ३१ जोडप्यांची गो मातेस आवश्यक असणारे पशु खाद्य, व इतर खाद्यांची तुला करण्यात आली. आपल्या वडीलधाऱ्यांच्या सेवेसह गो मातेची सेवा करण्यास मिळाल्याने जेष्ठ नागरिकांच्या कुटुंबीयांनी समाधान मानले. यानंतर तुला करण्यात आलेल्या या सर्व वस्तू गो शाळेस दान करण्यात आल्या. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले.