एरंडोल येथे नगरपालिकेतील कोरोना योध्द्यांचा सन्मान

एरंडोल प्रतिनिधी । येथील नगरपालिका सभागृहात रोटॲक्ट क्लब ऑफ जळगाव स्टार्स यांच्यातर्फे नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना कोविड योध्दा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

२२ मार्च २०२० पासून ते आजपावेतो कोवीडच्या काळात एरंडोल नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना कालावधीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे एरंडोल शहरातील कोरोनाच्या कहरास आळा घालण्यास आज रोजी यश प्राप्त झालेले आहे. यासाठी मुख्याधिकारी किरण देशमुख व नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच नगरपालिकेचे नगरसेवक व नगरसेविका यांच्या सहकार्यामुळे शहराने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केलेली आहे. सदर कार्याची दखल घेत रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगांव स्टार्स यांनी  एरंडोल नगरपालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सफाई कामगार यांना प्रमाणपत्र,प्रतिमेचे वाटप करून गौरविले.यावेळी रोटरी व रोटरॅक क्लब ऑफ जळगाव स्टार्सचे अध्यक्ष रोटे. धनराज कासट, अध्यक्षा रोट. मधुरा भोपे, सचिव रोटे अक्षय पंडित उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अजित भट यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी एरंडोल नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, मुख्याधिकारी किरण देशमुख, उपाध्यक्ष योगेश देवरे, नगरसेवक नितिन महाजन, प्रशासन अधिकारी संजय धमाल, बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, नोडल अधिकारी हितेश जोगी, शहर समन्वयक विवेक कोळी, पाणीपुरवठा अभियंता प्रियंका जैन कर्मचारी व सर्व वसुली कर्मचारी, सफाई कामगार तसेच सर्व अधिकारी व कामगार उपस्थित होते.

Protected Content