सिविल राइट्स प्रोटेक्शन सेलच्या राज्य उपाध्यक्षपदी प्रा.भरत शिरसाठ

एरंडोल प्रतिनिधी । सिविल राइट्स प्रोटेक्शन सेल या राष्ट्रीय स्तरावर नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी एरंडोल जिल्हा जळगाव येथील प्रा. भरत आत्माराम शिरसाठ यांची राज्य उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

कर्मचारी संवैधानिक अधिकार संरक्षण विभागाच्या राष्ट्रीय सचिव पदी सुद्धा त्यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद जीवने यांनी सदर नियुक्ती केली आहे. सदर नियुक्तीचे पत्र भरत शिरसाठ यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. डॉ. वंदना जीवने ह्या राष्ट्रीय संघटक म्हणून काम पाहत असून डॉ. किरण मेश्राम ह्या राष्ट्रीय महासचिव आहेत. डॉक्टर मनिष घोष हे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या संवैधानिक हक्क व अधिकाराच्या संरक्षणासाठी व्यापक प्रमाणात कार्य केले जात आहे. प्रा. भरत शिरसाठ हे राज्य समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे राज्याध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहतात. तसेच साहित्य क्षेत्रात सुद्धा त्यांनी चांगले कार्य केले आहे. त्यांची एकूण ४ पुस्तके प्रकाशित असून बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे ते राज्य सचिव आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Protected Content